नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील नगर वाचनालय खारेपाटण यांच्या वतीने “वाचन संकल्प सप्ताह” निमित्त नुकतेच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१
येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन नगर वाचनालय खारेपाटणचे विश्वस्त अशोक नवरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नगर वाचनालयाचे संचालक विजय देसाई, संतोष पाटणकर, राजेश वारंगे खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सकपाळ, लिपिक रिया जाधव, शिपाई – बाबू लाड, खारेपाटण केंद्र शाळेच्या शिक्षिका अलका मोरे, समिधा राऊत, आरती जोजेन, मिलिंद सरकटे, धुमक सर, अबीदा काझी आदी मान्यवर पदाधिकारी व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते.

“सद्या मोबाईलच्या प्रचंड वापरामुळे शालेय विद्यार्थी तसेच समजतील सर्वच घटकांचे पुस्तके वाचण्याचे प्रमाण फार कमी झाले असून आता वाचन संस्कृती बंद होते. की काय ? अशी भीती मनात झाली आहे. मात्र ही परस्थिती बदलायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने पुस्तक वाचले पाहिजे व कालबाह्य होत चाललेली वाचन संस्कृती व चळवळ आपण टिकवून ठेवली पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार नगर वाचनालय खारेपाटण नगर वाचनालयाचे विश्वस्त अशोक नवरे यांनी नगर वाचनालय खारेपाटण ने वाचन संकल्प सप्ताह निम्मित भरविण्यात आलेल्या प्रदर्शन मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. तर नगर वाचनालयाचे संचालक व सामजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी देखील ग्रंथ प्रदर्शना निम्मित आपले विचार व्यक्त करत शुभेछा दिल्या.

यावेळी खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. याचा फायदा शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी घेतला. तर नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत नगर वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सकपाळ व लिपिक रिया जाधव यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.

error: Content is protected !!