DMER पदभरती – २०२३ विरोधात विद्यार्थ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने घेतली विद्यार्थ्यांची दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांनी DMER COT – २०२३ पदभरती दरम्यान भरण्यात आलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्गाच्या न्याय हक्क मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे नुकतेच दि १५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य विभाग कामगार कर्मचारी शाखा यांचे वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली काम करत असलेली त्यांची आरोग्य कामगार कर्मचारी संघटनेने हे DMER पदभरती २०२३ प्रकरण उचलून धरले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याबाबत अधिक वृत्त असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांनी DMER COT – २०२३ पदभरती दरम्यान अधीपरोचारिका, तांत्रिक व अतांत्रिक अशा विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र याला २ वर्षे होऊन गेली तरी ही प्रक्रिया अजून सुरूच आहे. परंतु अद्यापही शासकीय महाविद्यालये व रुग्णालये येथे अधपरीचारकांची पदे रिक्त असून त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे.

तसेच या भरती प्रक्रिया दरम्यान लोकसभा व विधानसभा अशा दोन मोठ्या निवडणुका होऊन गेल्या त्यामुळे आणखी ४ महिने या प्रक्रियेला विलंब लागला. तर राज्यात ही भरती सुरू असतानाच सुमारे ९०० अधीपरिचाकांची पदोन्नती झाल्यामुळे या भरती प्रक्रिया मध्ये शेकडो विद्यार्थ्यांचे १ : ३ अशा प्रमाणात कागदपत्रे पडताळणी करून प्रतीक्षेत ठेवण्यात आली आहे. तसेच हे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून ९०० रिक्त अधीपरीचारिका पदासाठी ते पात्र आहेत मात्र जाणून बुजून सरकार याकडे दुर्लक्ष करीत असून राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने बेरोजगार विद्यार्थ्यांची दखल घेत गेले दोन महिने पत्रव्यवहार करत आहे. तर आरोग्य विभागाचे आयुक्त हे आरोग्य सेवेवर होत असलेल्या परिनामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. तसेच माजी सैनिकांचा २० % रिक्त, प्रकल्पग्रस्त असलेल्या उमेदवारांना अपात्र तथा अनुपस्थित दाखविने, अशा अनेक चुका DMER मार्फत झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

error: Content is protected !!