आ.नितेश राणेंच्या हस्ते कनेडी नाटळ रस्ता रुंदीकरण, नूतनीकरणचा शुभारंभ

आ. नितेश राणेंनी तब्बल 1 कोटी 52 लाखांचा निधी केलाय मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे) ते नाटळ रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणासह काँक्रीट गटार बांधणे कामाचा शुभारंभ भाजप आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या कामासाठी १,५२,०४, ७७७ रुपयांचा निधी आमदार नितेश राणे यांनी मंजूर करून दिला आहे. या भूमिपूजन समारंभा वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेशजी उर्फ गोट्या सावंत, सौ. संजना सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शक्ती केंद्र प्रमुख विजय भोगटे, भाजप पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!