तळेरे (प्रतिनिधी) : माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी भाजपा सिंधुदुर्ग चे भटके विमुक्त आघाडी सेल चे जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भाजपा भटके विमुक्त सेल च्या माध्यमातून शशिकांत इंगळे हे भाजपाचे कार्य करत आहेत. राजकारणाबरोबरच समाजकारणात ही शशिकांत इंगळे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची कार्याची दखल घेत माजी खा. निलेश राणे यांनी इंगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशी ओळख असलेल्या माजी खासदार निलेश राणेंनी इंगळे यांच्या घरी चहापान ही केले. यावेळी शशिकांत इंगळे यांनी राणे कुंटुंबियांची प्रतिमा असलेली फोटोफ्रेम माजी खा.निलेश राणेंनी भेटस्वरूपात देत त्यांचा सत्कार केला.यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवा उद्योजक विशाल परब, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.













