सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांगलादेशी महिला आढळलेल्या लॉज मालकाला अटक झाली आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे अनैतिक धंदे करणाऱ्यांना माफी नाही. भविष्यात ड्रग्स मुक्त आणि जिहादी मुक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पाहिला जिल्हा असेल. अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी सभा बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. येथील नागरिकांना सुरक्षित वातावरण वाटावे. जिल्ह्यातील दोन नंबरचे धंदे बंद व्हावेत, यासाठी आपला पुढाकार राहणार आहे. यासाठी २५ जानेवारी रोजी कायदा व सुव्यवस्था संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.
ड्रग्ज मुक्त आणि जिहादी मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा करणार – पालकमंत्री नितेश राणे












