विविध विकासकामांना करण्यात आला शुभारंभ
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील फणसगाव पंचक्रोशीत विकासकामांचा धडाका लावला असून विविध विकासकामांना आज शुभारंभ करण्यात आला.पोंभुर्ले येथील विजयदुर्ग मुख्य रस्ता ते मालपेवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत स्थानिक प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पाटगाव ग्रामपंचायत नजीक सौर पथदीप मंजूर करण्यात आले असून या कामाचेही भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी बाळ खडपे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली, बंड्या नारकर आदी उपस्थित होते.















