खारेपाटण मधील विकासकामांचे शिवसेनेच्यावतीने भूमिपूजन

जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ च्या अंतर्गत बाळासाहेबांची शिवसेना अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण शहरात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज खारेपाटण मध्ये जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी शिवसेना पक्षचे विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे,अस्ताली पवार, जयदीप देसाई,शितीजा धुमाळे, सामाजिक कार्यकर्ते कुबल गुरू,नंदू कोरगावकर,खांडेकर,बबन तेली,सुहास राऊत,दिनेश खांडेकर,मंगेश ब्रम्हदंडे,देवानंद ईसवलकर,राजू शिंदे,प्रणय गुरसाळे,शिवाजी पाटील,सुयोग ब्रम्हदंडे, प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रिया वडाम आदी मान्यवर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण मंजूर करण्यात आलेली विकास कामे पुढील प्रमाणे – १) देव कालभैरव मंदिर मार्गे खारेपाटण बाजारपेठकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (एकूण ४ लाख रुपये) २) खारेपाटण हायवे सर्व्हिस रोड ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (एकूण ३ लाख रुपये ) ३) कोंडवाडी पाण्याची टाकी ते खांडेकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ( एकूण ४ लाख रुपये ) ४) मुलाणी घर ते कुबल गुरूजी घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.(एकूण १ लाख रुपये ) वरील सर्व विविध विकास कामांचा शुभारंभ आज खारेपाटण येथे शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,सिंधू रत्न योजना महाराष्ट्र राज्य संचालक किरण उर्फ भैया शेठ सामंत,पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून खारेपाटण मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.यापुढेही विविध विकासकामे आमच्या शिवसेना पक्षच्या वतीने खारेपाटण शहरात व खारेपाटण – तळेरे विभागात करण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!