देवगड नगरपंचायतच्या आज होणाऱ्या सभापती निवडणुकीत ट्विस्ट

देवगड नगरपंचायतच्या आज होणाऱ्या सभापती निवडणुकीत ट्विस्ट

शिवसेनाप्रमुख संजय आग्रे यांनी गटनेते संतोष तारींना सभापतीपदासाठी प्रणाली माने, आद्या गुमास्ते, रुचाली पाटकर याना मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यासाठी काढला आदेश

ठाकरे गटात सक्रिय असणारे सत्ताधारी गटनेते तारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत च्या आज होणाऱ्या सभापती निवडीत ट्विस्ट निर्माण झाला असून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी ठाकरे शिवसेनेत सध्या सक्रिय असणारे सत्ताधारी गटनेते संतोष तारी याना सभापती निवडीबाबत व्हीप बजावण्यासाठी आदेश काढला आहे.त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आणि सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय असलेले गटनेते संतोष तारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांनी लेखी आदेश काढत सत्ताधारी गटनेते संतोष तारी याना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण शिवसेना पक्ष्याच्या अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये निवडून आलेले आहात. आज होणाऱ्या बांधकाम सभापती पदासाठी प्रणाली माने, आरोग्य सभापतीपदासाठी आद्या गुमास्ते, पाणीपुरवठा सभापतीपदासाठी ऋचाली पाटकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून नावे घोषित करून त्यांना मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यात यावा असे आदेश जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी काढले आहेत. त्यामुळे आज दुपारी होणाऱ्या देवगड नगरपंचायत च्या सभापती निवडीत सत्ताधारी गटनेता तारी आणि त्यांच्या गटातील नगरसेवक पक्षादेश पाळून व्हीप बजावतात अथवा नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!