करिअर कट्टा स्पर्धा मध्ये उत्कृष्ट प्राचार्य म्हणून निवड…
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत असलेले खारेपाटण येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहयत्ता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय करिअर कट्टा स्पर्धा – २०२४ – २५ मध्ये उत्कृष्ट प्राचार्य म्हणून निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
सन २०१२ मध्ये खारेपाटण येथे प्रथमच कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. नुकताच या महाविद्यालयाला नॅक समितीद्वारे “बी” नामांकन प्राप्त झाले असून महाविद्यालयाच्या या प्रगतीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांचे मोठे योगदान आहे. या अभिनंदनीय निवडी बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ सदस्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी देखील प्राचार्य कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.














