नानेली येथील “मैत्री चषक 2025” क्रिकेट स्पधेत भक्ती वॉरीयर्स विजेता

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नानेली पुरस्कृत “ मैत्री चषक 2025” क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भक्ती वॉरीयर्स संघाने थर्मल 11 संघावर विजय मिळवून दुसऱ्या पर्वाचे जेतेपद पटकावले. 26 आणि 27 जानेवारी अशा दोन दिवस चालू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भक्ती वॉरीयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 45 धावा जमविल्या. युवराज मेस्त्री याने तडाखेबाज फलंदाजी करत 26 धावांचे योगदान दिले. अष्टपैलू संघाचा भरणा असलेला थर्मल 11 संघ 30 चेंडूमध्ये 46 धावांचे आव्हान आरामात पूर्ण करेल असे वाटत होते मात्र विनायक मेस्त्री याने 2 षटकात टिच्चून मारा केला आणि थर्मल 11 संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवले. त्याला इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली. शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना समीर मेस्त्री याने केवळ 4 धावा देत थर्मल11 संघाचे 3 गडी बाद करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार युवराज मेस्त्री या खेळाडूला देण्यात आला. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज एस. डी. ब्रदर्स किंग्ज संघाचा राज धुरी, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज भक्ती वॉरीयर्स संघाचा विनायक मेस्त्री, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक – भक्ती वॉरीयर्स संघाचा अथर्व नार्वेकर आणि मालिकावीर पुरस्कार थर्मल 11 संघाचा अष्टपैलू खेळाडू अरविंद घाटकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या भक्ती वॉरीयर्स संघाला रोख रक्कम 11,111 रु. आणि चषक तर उपविजेत्या थर्मल संघाला 7,777 र आणि चषक देण्यात आला.

या स्पर्धेचे उद्घाटन हरिश्चंद्र घाडी आणि शिवसेना (उ बा ठा) शाखाप्रमुख नानेली – काशिनाथ उर्फ तेजस धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे पोलीस पाटील संजय धुरी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तर बक्षीस वितरण शिवसेना ( उ बा ठा) विभाग संघटक कौशल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत माजी जि. प. सदस्य श्री रमाकांत तामाणेकर, युवसेना तालुका प्रमुख कुडाळ – योगेश धुरी, ग्रा. पं. सदस्य माणगाव – रोशन भिसे, राजू तामाणेकर तसेच इतर अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या स्पर्धेत समालोचक म्हणून परेश नार्वेकर, प्रताप धुरी, अभिषेक घाडी, रुपेश नार्वेकर यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून विनय कदम, समीर मेस्त्री, ओमकार कदम यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवसेना ( उ बा ठा ) नानेलीचे तेजस धुरी, प्रशांत वारंग, अमित मेस्त्री, विनय कदम, संदीप नाईक, हेमंत घाडी, सागर घाडी, विश्वनाथ अणावकर, ओमकार कदम, दत्तप्रसाद वारंग, विकास धुरी, शुभम धुरी, रोहित धुरी, तुषार धुरी, प्रकाश मेस्त्री तसेच गावातील ग्रामस्थांनी मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी युवासेना उपसचिव गीतेश राऊत यांनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!