आमदार नितेश राणेंच्या हस्ते हरकुळ ( बु. ) जलजीवन मिशन नळयोजनेचे भूमिपूजन

1 कोटी 38 लाखांचा निधी प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणेंच्या हस्ते हरकुळ ( बु.) येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळयोजनेच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत हरकुळ ( बु.) गावासाठी 1 कोटी 38 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यावेळी माजी उपसभापती बाबासाहेब वर्देकर, माजी सरपंच बुलंद पटेल, माजी उपसरपंच परब, राजू पेडणेकर, निलेश तेली, ग्रामविकास अधिकारी संजय कविटकर, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!