केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्यमहोत्सव

संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 7 एप्रिल रात्रौ 6 वाजता आम्ही लाल परी निर्मित विलास खानोलकर लिखित, गणपत घाणेकर आणि सहा. दिग्दर्शक सुहास वरुणकर दिग्दर्शित दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो, 8 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचे रक्तजल डोहाळे, रात्रौ 9 वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे अर्धशिरा, 9 एप्रिल सायं. 6 वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांचे वरुण देव गर्वहरण, रात्रौ 9 वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचे कृष्ण पूजन, 10 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचे बालभूवनेश्वर, रात्रौ 9 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ यांचे कुर्मादासाची वारी या दशावतारी नाट्य प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!