चिंदर सडेवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ !

सडेवाडी तेरईवाडी रस्ता कामाचा संतोष गांवकर तर सडेवाडी गणेश घाट सुशोभीकरणचा सदाशिव घागरे यांच्या हस्ते शुभारंभ

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. चिंदर तेरई ते सडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन तंटामुक्त अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या तर सडेवाडी देवकोंड गणेश घाट सुशोभीकरण करणाच्या कामाचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक सदाशिव घागरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, रविंद्र घागरे, दिगंबर जाधव, संतोष अपराज, दक्षता सुर्वे, मनोज हडकर, अंजली गोसावी, स्वाती सुर्वे, संजय सावंत, शेखर पालकर, धनश्री गोसावी, संजय लोके, हर्षद बेनाडे, रविंद्र गोसावी, प्रमोद सुर्वे, रघुनाथ घागरे, सचिन हडकर, विनोद सावंत, बळिराम मुळ्ये, पप्पू घागरे, अजिंक्य सुर्वे, वैशाली गोसावी, संदिप सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!