श्री देव गणपती देवस्थान मिठबांव-उत्कटवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव

देवगड (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे दि.1 फेब्रुवारी राेजी श्री गणेश जयंती उत्सव श्री देव गणपती देवस्थान मिठबांव-उत्कटवाडी येथील गणेश मंदिरात साजरा हाेणार आहे.त्यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहेत.तसेच तिरंगी डबलबारीचा जंगी सामन्याचे आयाेजन करण्यात आले आहे.

सकाळी 8 वाजता गणेश पुजन व अभिषेक,सकाळी 10 वाजता आरती, दुपारी 12 ते 3 वा.पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजल्यापासुन स्थानिक भजने, रात्री 8 वा.आरती. त्यानंतर रात्री 9.30 वाजता महिला डबलबारीचा तिरंगी सामना कालिकामाता प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी-गुहागर धाेपावे गाव, बुवा तेजल जाधव विरुद्ध श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ लाेरे नं 1 (नरामवाडी) बुवा रिया मेस्त्री विरुद्ध श्री अष्ठविनायक प्रासाधिक महिला भजन मंडळ साळेल-मालवण यांच्यात हाेणार आहे.

भाविक भक्तांनी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त हाेणार्या कार्यक्रमांचा तिर्थप्रसाद, महाप्रासादाचा लाभ घ्याव असे आवाहन श्री देव गणपती देवस्थान मिठबांव-उत्कटवाडी मंडळाचे एम . के लाेके ,सुरेश लोके तसेच मुंबई मंडळाचे गोविंद लोकेगावकर व अशोक लोके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!