ओझरम बौद्धवाडी रस्त्याचे गौडबंगाल

मंजूर असलेला रस्ता अधिकारी वर्गाने जाणून बुजून वगळला

रस्ता न झाल्यास ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

कणकवली (स्वप्नील तांबे) : एकीकडे विविध पक्षाच्या माध्यमातून गावांमध्ये रस्त्यांची भूमिपूजने होत असून गाव विकासाकडे वाटचाल करताना दिसत आहेत तर, कणकवली तालुक्यातील ओझरम सारख्या दुर्गम भागातील रस्त्याला मंजुरी मिळूनसुद्धा रस्त्याच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम ते बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. येथील ग्रामस्थांना ये जा करण्याचा हा मुख्य रस्ता आहे. एस.टी. साठी जायचं असल्यास सुमारे दीड किलोमीटर ग्रामस्थांना चालत जावे लागते. तसेच विध्यार्थी शाळेत जाताना तसेच वयोवृद्ध ग्रामस्थ दवाखान्यात जाताना त्रास होतो. याच रस्त्याला प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, सदर रस्त्याचे डांबरीकरण हे १९८८ साली झाले होते. त्यानंतर एकदाही रस्त्याची दुरुस्ती किंवा देखभाल झालेली नाही.

अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या प्रयत्नातून ओझरम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम ते बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अर्ज केला असता, त्यास शासनाने मंजुरी दिली होती. (शासनाचे पत्र क्र .मु.ग्रा.यो. २०२२ प्र. क्र. 8 बांध -4 दि. 15 ऑक्टोबर २०१२ चे सह पात्र प्र. प.श.अ अनुक्र २८ सुभाष देसाई,अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) पण दुर्दैवाने सदर रस्त्याचे काम काही अधिकारी वर्गाने जाणून बुजून वळविले आहे. सदर रस्त्यासाठी मंजुर झालेला निधी का वापरत नाही? तो निधी कुठे वापरण्यात आला? तो निधी का वगळण्यात आला? त्याचे कारण काय? या बाबीचे उत्तर ग्रामस्थांना संबंधित खात्याकडून हवे आहे. त्यासाठी या कामासंबंधी प्रत्येक अधिकाऱ्यास निवेदने दिलेली आहेत. यावेळी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आनंद तांबे तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप तांबे, ग्रामस्थ लवेश तांबे, मनोज तांबे, तुषार तांबे, उदय तांबे, मोंडकर आदी उपस्थित होते. (मा . कार्यकारी अभियन ग्रामिण विकास संस्था कुडाळ सिंधुदुर्ग, मा. जिल्हाधिकारी ओरोस सिंधुदुर्ग).

जर शासनाने याबाबत योग्य ती दखल घेऊन कारण न सांगितल्यास ग्रामस्थांना संविधानिक मार्गाने पुढील नियोजन करून प्रसंगी धरणे आंदोलनाद्वारे आमच्या हक्काचे काम आम्हाला मिळवावे लागेल, असा इशारा ओझरम बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ह्या रस्त्याला प्राधान्य देऊन रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

error: Content is protected !!