व्यक्तिमत्व विकासासाठी व्यवसायिक कौशल्ये गरजेचे – चेतन गोडबोले

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वाणिज्य विभाग ,अंतर्गत हमी व गुणवत्ता कक्ष आणि निलया फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘ बी अ कार्पोरेट लीडर विथ कॉमर्स’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा निलया फाउंडेशन, पुणे यांचे राज्य समन्वयक पंकज गावंडे व गौरी कुलकर्णी-नाईक यांच्या समन्वयाने कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी वाणिज्य व संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते. ” प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाबरोबर व्यवसायिक कौशल्ये अंगिकारणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन निलया फाउंडेशन, पुणे या संस्थेचे प्रशिक्षक चेतन गोडबोले यांनी या वेळी केले.

चेतन गोडबोले आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, ” व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्तीचे सामर्थ्य, सौंदर्य व संपन्नता, आत्मविश्वास, कार्यक्षमता, स्मरणशक्ती, संभाषण, नेतृत्व, वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, धेयनिष्ठा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा इत्यादी प्रकारे व्यक्तिमत्व विकास साधता येतो. स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा कार्यशाळेतून कौशल्ये सुधारण्याची संधी प्राप्त होते” असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम होते.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख प्रा. आदिती मालपेकर-दळवी यांनी केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. रामदास बोलके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सागर गावडे यांनी मानले. याप्रसंगी प्रा. प्रियंका सुतार प्रा. स्विटी जाधव, प्रा.पल्लवी चिंदरकर, प्रा. मंदार पडेलकर, प्रा. प्राची मिशाळ , प्रा. गीता कुनकुवळेकर, प्रा. साहिल मांणगांवकर आदि शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!