खांबाळे मोहितेवाडी येथे वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण

मुलगा विलास मोहिते वर गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण करणाऱ्या विलास बाबाजी मोहिते रा. खांबाळे मोहितेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील बाबाजी केशव मोहिते ८० यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

आरोपी विलास मोहिते हा रात्री दारू पिऊन घरी आला. त्याने  शिवीगाळ करून तुमच्यामुळे माझी बायको मला सोडून गेली असे म्हणत वडिलांना जोरदार माराहाण केली. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत वडील बाबाजी मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा विलास मोहिते याच्यावर माराहाण प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास महिला पोलीस सोनल गोसावी करीत आहेत..

error: Content is protected !!