आयजी संजय दराडे यांनी घेतले आई भराडी देवीचे आशीर्वाद !

मसुरे (प्रतिनिधी): कोकण क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी शुक्रवारी सायंकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या संजय दराडे यांचे श्री भराडी देवी मंदिरात आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने स्वागत करत सत्कार करण्यात आला. तसेच 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जत्रोत्सवास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. यावेळी मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा देखील आंगणे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मंडळाचे सचिव काका आंगणे, भास्कर आंगणे, बाबू आंगणे, मसुरे बिट अंमलदार प्रमोद नाईक, मालवण पोलीस कैलास ढोले, सीताराम आंगणे, दिनेश आंगणे, नंदू आंगणे, सतीश आंगणे, रामदास आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!