खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.३ या शाळेत नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पाककला वारगाव गावचे उपसरपंच नाना शेटये यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे विजेत्याना बक्षीस म्हणून सिंधुदुर्ग ते मुंबई विमान प्रवास मोफत असे ठेवण्यात आले होते. तर उर्वरित स्पर्धकांना छत्रपती संभाजी राजा यांच्या जीवन चरित्रावर आधारित ऐतिहासिक “छावा ” हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.असे एकूण स्पर्धेचे बक्षिस स्वरूप ठेण्यात आले होते.तर या पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून खारेपाटण प्राथमिक.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम मॅडम तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.१ च्या मुख्याध्यापिका जंगले मॅडम. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारगाव नं. २ चे मुख्याध्यापक विश्वनाथ चव्हाण यांनी काम पाहिले.
या पाककला स्पर्धेला ग्रा.पं. सदस्य सुभाष धावडे मानसी प्रभू, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तसेच या शाळेचे मुख्याध्यापक केसरकर सर यांनी शाळेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे विजेते ठरलेले स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक रविना गुरव, द्वितीय क्रमांक अंजली गुंडये तर तृतीय क्रमांक पूजा पेटकूलकर या सर्व विजयी स्पर्धकांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.



