भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचा महिला दिन साजरा

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयाेजन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार ८ मार्च रोजी उत्कर्ष हाॅल कणकवली येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला.सदर मेळाव्यास रत्नागिरी जिल्ह्यातील घरेलु कामगार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव संजना वाडकर ऊपस्थित राहिल्या.यावेळी संजना वाडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष विकास गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदना तावडे यांनी गीत सादर केले.प्रमुख अतिथी यांचे हस्ते प्रतिमा पूजन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.व्यासपिठावरील मांन्यवरांचा परिचय आणि स्वागत करताना संजना वाडकर यांचे स्वागत जिल्ह्याच्या वतीने भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सत्यविजय जाधव यांनी केले.भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यासपिठावरील मांन्यवरांचे स्वागत केले.विकास गुरव यांनी सुत्रसंचालनासहीत प्रास्ताविक माहिती दिली.अध्यक्ष सत्यविजय जाधव यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले.

घरेलु कामगार संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.संजना वाडकर यांनी मेळाव्यास उपस्थित महिलांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले.त्याच बरोबर उपस्थित महिलांची संख्या बघुन जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय मजदूर संघाशी एकनिष्ठ असुन कार्यतत्पर असल्याने सर्वांचे भरभरून कौतुक केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कार्यक्रमाचा वेगळाच अनुभव आणि आनंद मिळाल्याचे समाधान देखिल व्यक्त केले.सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांस प्रोत्साहित केले.भारतीय मजदूर संघाचे एकनिष्ठ शिलेदार माजी कोषाध्यक्ष मा.सुधिरजी ठाकुर यांनी आजच्या वास्तविक जीवनातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याबाबत महिलांना अतिशय सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले.

महिला मेळाव्यानिमित्त जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर मा.सौ.बिरमोळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यास शुभेच्छा देताना महिलांच्या आरोग्याबाबत अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले.जर आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम असो कार्य करु शकतो आणि यासाठी वेळीच जागरुक राहिले पाहिजे.काही ठराविक आजारांवर आपल्याजवळ अत्यंत कमी फी मधे तपासणी किंवा उपचार करण्यात येतील.सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे कार्ड वाटप करत सर्वांना आवाहन केले.डाॅ.बिरमोळे आपल्या परिचारिका टिमसहित उपस्थित राहिल्या.मेळाव्यातील त्यांच्या आगमन वेळी जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव यांनी त्याचे आणि त्यांच्या टिमचे स्वागत केले.

एकुणच महिला मेळाव्यास जिल्हाभरातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.एका वेगळ्याच ऊन्मादामधे महिला मेळावा अभुतपुर्व अशा पद्धतीने प्रथमच पार पडला असे संजना वाडकर आणि डाॅ.बिरमोळे यांनी सांगितले.शेवटी जिल्हा अध्यक्षांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार माणून कार्यक्रमाची सांगता केली.

error: Content is protected !!