वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पिठासीन अधिकारी जगदीश कातकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नेहा माईणकर, रणजित तावडे, रोहन रावराणे, विवेक रावराणे, राजन तांबे, सुभाष रावराणे, संगीता चव्हाण,दर्शना पवार, यामिनी वळवी, यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच माजी उपसभापती बंडया मांजरेकर, शांतेश रावराणे, मारुती मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.  या सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन रावराणे यांचे अभिनंदन केले. प्रदीप रावराणे यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार अतिषबाजी केली. तसेच ढोल तशाच्या गजारात आनंद साजरा करण्यात आला. निवडीनंतर रावराणे यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

error: Content is protected !!