ओरोसमधील शिक्षक भारतीच्या साखळी धरणे आंदोलनचा तिसरा दिवस !
तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वर्षोनुवर्षे रखडलेली प्रलंबित कामांची पूर्तता करावी, सर्व प्रस्तावासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची चेक लिस्ट लेखी जाहीर करावी.शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळालेल्या तारखेपासून सर्व आर्थिक लाभ मिळावेत. सर्व संघटनांच्या सहविचार सभा वर्षातून किमान तीन वेळा आयोजित कराव्यात. अशा अनेक मागण्यासाठी शिक्षक संघटनेच्या वतीने जि.प. सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर सलग तीन दिवसांपासून बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात संघटनेचे राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर,शरद देसाई,के.एस.नाईक सहभागी झाले आहेत तर या आंदोलनाला दिवसेंदिवस जिल्हाभरातून शिक्षकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण,अद्यापही सदर आंदोलन स्थळी माध्यमिक शिक्षण विभागातील कोणीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत.जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत हे साखळी धरणे आंदोलन बेमुदत चालू राहील असा इशारा संघटनेच्यावतीने दिला आहे.आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सी.डी.चव्हाण, समीर परब,अनिल राणे, वैभव केंगरे, योगेश गावित, शेगा पाडवी, ज्ञानेश्वर सावंत, युवराज सावंत, प्रशांत रावळ, पी एस सावळे,प्रतिभा केळुसकर, दत्तात्रय मारकड,रुपेश बांदेकर, केशव ढाकरे,मनाली नाईक,डी.टी.वसावे, डॉ.के.आर.पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला.
