आचरा (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00वाजता नगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक-मालक कृती समितीचे राज्य सचिव नितीनजी पवार जिल्ह्यातील रिक्षाचालक मालकांना रिक्षा संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या घातक निर्णयावर रिक्षा चालक मालकांचे होणारे नुकसान त्यावर करावयाच्या उपायोजना अशा अनेक विषयांवर नितीन पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक-मालक यांनी सायंकाळी चार वाजता नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पैं सभागृहा नजिक कॉन्फरन्स हॉलमध्ये उपस्थित रहावे. अशी विनंती सावंतवाडी तालुका रिक्षा सेनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत व कोकण विभागाच्या रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव पराडकर, कोकण विभाग कार्याध्यक्ष संतोष नाईक तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.
