चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुका अधिवक्ता परिषद यांच्या वतीने मालवण येथील दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर मालवण तालुका बार असोसिएशनच्या महिला अधिवक्ता उपस्थित होत्या
अधिवक्ता परिषद,मालवण तर्फे जागतिक महिला दिना निमित्त मालवण वकील संघातील सर्व महिला भगिनींचा व दिवाणी न्यायालयातील सर्व महिला कर्मचारी यांचा आत्मीयतेने सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास अधिवक्ता श्रीमती बांदेकर, शिल्पा टिळक,सोनल पालव यांनी या स्तुत्य उपक्रम आयोजित केल्या बद्दल समाधान व्यक्त केले मालवण तालुका अधिवक्ता अध्यक्ष प्रदीप मिठबावकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक पलाश चव्हाण, कार्यक्रमाचे आभार प्रथमेश सामंत यांनी मानले.










