वस्त्रोद्योग मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक संजय सावकारे यांचा प्रमोद रावराणे यांच्या हस्ते सत्कार

वैभववाडी प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक आमदार संजय सावकारे यांची राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या हस्ते नामदार सावकारे यांचा कोकण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.भाजपा नेते नामदार संजय सावकारे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रीपदी नियुक्ती केली. वस्त्रोद्योगमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल नामदार सावकारे यांच्या सत्काराचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कोकण विभागाच्या वतीने महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या हस्ते नामदार सावकारे यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!