मुंबईत रंगणार 22 फेब्रुवारी पासून MPL चा थरार !

श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांचे आयोजन

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावी एकत्र विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न होतात. मुंबईतही एकत्र येत कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काही संघटनात्मक काम करता यावं या उद्देशाने श्री भगवती देवी प्रतिष्ठान मुणगे मुंबई यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. गावाची माहिती देणारी दिनदर्शिका वितरण उपक्रम श्री देवी भगवतीच्या यात्रोत्सवाच्या दरम्यान नुकताच झाला. मुंबईतील तरुणांसाठी MPL मुणगे प्रीमिअर लीग – ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 22 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी भांडुप गाव मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्व खेळाडू लिलाव पद्धतीने संघाना देण्यात आले आहेत. लिलाव दिनांक 9 फेब्रुवारी ला झाला.अनेक खेळाडूंनी सहभाग दर्शवला त्यात विशेष करून गावावरून संस्थेचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित झाले होते.या लिलावा साठी मांगल्य मंगल हॉल चे मालक दिलीप बागवे आणि सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याच बरोबर तपन माळकर, नितीन पाडावे व सुधीर पाडावे , प्रवीण आईर, संतोष सावंत,दिलीप बेळेकर, पंकज धुवाळी , प्रसाद मुणगेकर आणि भगवती फाइटर्स संघ मालकांनी विशेष योगदान देत या लिलावाला रंगत आणली.

पहिल्यांदाच मुंबईत होत असलेल्या स्पर्धेला गावातील विविध सामाजिक-शैक्षणिक संस्था,प्रशासकीय व्यक्तिमत्त्व, देवस्थान कमिटी , आजू बाजूच्या गावातील मित्र मंडळी त्याच बरोबर गावातील नामांकित व्यक्तिमत्व आणि मित्र परिवार यांना आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत गावातीलच क्रिकेट प्रेमी रहिवासी गोविंद सावंत,तुषार मुणगेकर, नितिन माळकर , उल्हास लब्दे ,जतीन राणे, सतीश साळसकर, निवृत्ती पडवळ, प्रवीण आईर अश्या व्यक्तिमत्वानी आणि मुंबईतील भगवती क्रिकेट क्लब ने स्पर्धेला लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करत स्पर्धेसाठी मोठं योगदान दिल आहे. ही स्पर्धा स्पर्धा रुपात न पाहता सर्व जेष्ठ मंडळी ,तरुण मंडळी आणि विद्यार्थी यांनी दोन दिवस खेळाच्या माध्यमातून मुंबई सारख्या विभागात एकत्रित येत तरुणाईच्या नवनवीन संकल्पनांना वाव देण्याचं साधन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असल्याचं मत संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष उदय लब्दे सचिव ,योगेश सावंत ,खजिनदार सुनील हिर्लेकर आणि सर्व सदस्य यांनी व्यक्त केलं. या उपक्रमाला ज्यांनी ज्यांनी आर्थिक किंवा वैयक्तिक सहकार्य करत हातभार लावला त्यांचे विशेष आभार ही संस्थेच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!