सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती समाज मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने अभिवादन
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत संत शिरोमणी रविदास यांची जयंती सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने कणकवलीत साजरी करण्यात आली. चंद्रकांत भोसले यांच्या निवासस्थानी संत रविदास यांच्या प्रतिमेचे तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या हस्ते पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला.संत रविदास यांचे समाजप्रबोधनाचे जातिभेदापलीकडील विचार आजही संपूर्ण समाजाला दिशादर्शक आहेत. समानतेची शिकवण देणारे संत शिरोमणी रविदास हे समाजाला दीपस्तंभ आहेत अशा शब्दांत उपस्थितांनी संत रविदास यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी तालुका सचिव अविनाश चव्हाण, उपाध्यक्ष सत्यविजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, खजिनदार नामदेव जाधव, प्रविण म्हापणकर, जेष्ठ समाज बांधव चंद्रकांत भोसले, शरद जाधव, सुधिर जाधव, केशव पावसकर, यशवंत भोसले, समाज बांधव अशोक नारकर, संदिप जाधव, सदानंद कदम, गणेश शिरकर, अंकुश किंजवडेकर, देवराज जाधव, संतोष जाधव, प्रभाकर चव्हाण,अमित भोसले आदी उपस्थित होते.
