दारिस्ते गावातील पीएमजीएसवाय रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा उत्तम लोके यांचा दावा

सुधारणा न केल्यास रास्ता रोको चा दिला इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावातील पिएमजीएसवाय अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत याविरोधात रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेना उबाठा कणकवली युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी कार्यकारी अभियंता पिएमजीएसवाय यांना लेखी निवेदनातून दिला आहे. निवेदनात लोके यांनी म्हटले आहे की,दारिस्ते गावातील PMGSY योजने अंतर्गत माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीमुसार मंजुर झालेल्या रस्त्यावर सध्या काम चालू आहे. या कामात ज्या मोऱ्या बांधलेल्या आहेत त्यांना मजबुतीकरण केलेले नसून त्याचा पाया हा निकृष्ट स्वरुपाचा बांधलेला आहे. तसेच त्या मोठ्या अपघातास कारणीभूत ठरतील अशा स्वरुपाच्या बांधल्या गेल्या आहेत.

रस्त्याच्या भरावाला जी GSB वापरायची असते ते न वापरता मातीचा वापर केलेला आहे व त्यावर पाणी न वापरता Rolling केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ म्हणून माझी तक्रार असून ही निकृष्ट कामाची सुधारणा केली नाही तर माजी खासदार यांच्या मार्फत कायदेशीर तक्रार करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या कामाचा दर्जा सुधारण्यात आला नाही तर गावातर्फे काम बंद आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.

मोऱ्यांचे पाईपलाईन चुकीचे डायरेक्शन असल्यामुळे आणि साईट पट्टी नसल्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता दाट असून हे कनिष्ठ अभियंता श्री. पुरी आणि वरीष्ठ अभियंता श्री. चव्हाण यांना ग्रामस्थांनी दर्शनास आणून देऊन सुध्दा काहीही बदल केला नसून यावर प्रशासनाचा काम चालू असते वेळी कोणताही लक्ष नाही आहे जर येथे अपघात झाल्यास याला जबाबदार प्रशासन असणार आहे. यावर त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करुन बदल करुन घ्यावा अन्यथा येणाऱ्या ८ दिवसामध्ये रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा लोके यांनी दिला आहे.

error: Content is protected !!