कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांचा भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्सव वेळी विशेष गौरव करण्यात आला. संघटनेचे संस्थापक राज्यअध्यक्ष पंढरी चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन बबली राणे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष सी आर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव आदी उपस्थित होते. बबली राणे हे मागील २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई गोवा नॅशनल हायवे वरील अपघातग्रस्त जखमी ना रात्रंदिवस तातडीची मदत करतात. बबली राणे निस्वार्थीपणे करत असलेल्या या जनसेवेची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.















