सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रहारचे सिंधुदुर्ग नगरीतील पत्रकार आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सेक्रेटरी बाळ खडपकर यांच्या मातोश्री चे निधन झाल्यानंतर त्यांचे निवासस्थानी जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी खडपकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.
