बाबू इलेव्हण खारेपाटण अंतिम विजेता तर एन सी सी पांगरे उपविजेता
खारेपाटण (प्रतिनिधी) : केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या खुल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म क्रिकेट स्पर्धेत आज रविवार दी.२३ फेब्रु.२०२५ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बाबू इलेव्हन खारेपाटण हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला रोख रुपये २५,५५५ /- रकमेचे पारितोषिक व प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.तर उपविजेता एन सी सी पांगारे या संघाला रोख रुपये १५,५५५ /- रकमेचे परितोषिक व द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
केदारेश्वर मैदान खारेपाटण येथे दी.२१ ते दी.२३ फेब्रुवारी २०२५ अशी सलग ३ दिवस पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण २८ संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,संचालक विजय देसाई, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव,मंगेश गुरव,संतोष पाटणकर,संकेत शेट्ये,शंकर राऊत, दिगंबर राऊत,ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले,सौ अमिषा गुरव,मंडळाचे कार्यकर्ते अमोल गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम विजेता संघ बाबू इलेव्हण खारेपाटण या संघाला प्रमुख अतिथी दिलीप तळेकर यांचे शुभहस्ते प्रथम क्रमांकाचा चषक देऊन गौरविण्यात आले.तर उपविजेता एन सी सी पांगरे या संघाला सरपंच प्राची ईसवलकर यांचे शुभहस्ते द्वितीय क्रमांकाचा चषक देऊन गौरविण्यात आले.तसेच या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून एन सी सी पांगरे या संघाचा खेळाडू स्वराग कुळये याला संपूर्ण स्पर्धेत ८२ धावा काढल्या बद्दल चषक देऊन गौरविण्यात आले.तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बाबू इलेव्हन खारेपाटण या संघाचा खेळाडू अमर जाभवडेकर याला चषक देण्यात आला.व उत्कृष्ट शेत्ररक्षक म्हणून एन सी सी पांगरे संघाचा खेळाडू गुलजार मोडे याला चषक देण्यात आला.तसेच स्पर्धेचा मालीकाविर म्हणून चषक बाबू इलेव्हन खारेपाटण या संघाचा खेळाडू अमर जाभवडेकर याला देण्यात आला.तर अंतिम सामन्याचा सामनावीर हा चषक बाबू इलेव्हण खारेपाटण या संघाचा खेळाडू प्रणय सावंत याला प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना दिलीप तळेकर म्हणाले खारेपाटण येथे क्रिकेट स्पर्धा म्हटली की त्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.येथील नागरिक क्रिकेटवर प्रेम करणारे असून स्पर्धा निकोप पार पाडण्यासाठी सहकार्य करतात.या मंडळाने सुंदर स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांना शुभेछा दिल्या.यावेळी प्रवीण लोकरे,प्राची ईसलकर यांनी देखील मनोगते व्यक्त करत शुभेछा दिल्या. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे केदारेश्वर मित्र मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तर संपूर्ण क्रिकेट मॅच एम एस स्पोर्ट्स द्वारे यू ट्यूब लाईव्ह दाखवण्यात आली होती.


















