कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा आठवा वर्धापन दिन व श्री सत्यनारायण महापुजा गुरुवार दि.1 मे राेजी आयाेजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न हाेणार आहेत.
सकाळी 7 वा.एकादशमी,त्यानंतर 9.30 ते 11.30 वा. सत्यनारायण महापुजा, आरती व तिर्थप्रसाद, दुपारी 1 ते 30 वा.महाप्रसाद, सायंकाळी 6 वा. निमंत्रित भजने, रात्री 8 ते 10 वा.बाळ गाेपाळ मंडळ आचरा वरची चावडी येथील पाैराणिक आणि संत चरित्रांवर आधारीत देखाव्यांचा समावेश असलेले वारकरी दिंडी भजन, रात्री 10 नंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व फनी गेम्स स्पर्धा संपन्न हाेणार आहेत.
भाविक भक्तांनी वर्धापन दिन, सत्यनारायण महापुजा व कार्यक्रमांचा उपस्थित राहन लाभ घ्यावा असे आवाहन श्री लिंगेश्वर मित्रमंडळ व ग्रामस्थ कलमठ गावडेवाडी यांनी केले आहे.












