वैभववाडी (प्रतिनिधी) : नाशिक येथे नाशिक अथलेटिक्स फॉउंडेशन यांनी दि. २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी आयोजन करण्यात आलेल्या ३ऱी राज्यस्तरीय मैदानी (अथलेटिक्स )स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल गावातील खेळाडू, श्री फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम, कणकवली येथे या क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या सेंट मेरी हाय या शाळेत शिक्षण घेणाऱ्या नवोदित खेळाडू अद्वैत ज्ञानेश्वर गुरव याने ८ वर्षा खालील मुले या गटात लांब उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून कास्य पदक व प्रविण्या प्रमाणपत्र मिळवले. तसेच या क्रीडा स्पर्धे मध्ये खुल्या गटात पुरुष – देवबा देसाई, ओम उन्हाळकर, तसेच १२ वर्षा खालील मुली – आस्था अमित लीगवत, अवनी प्रमोद घाडीगावकर यांनी या स्पर्धे सहभागी झाले हे सर्व खेळाडूंना त्याचे मार्गदर्शक समीर जयवंत राऊत याच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेतले. तसेच संस्थेच्या वतीने प्रमोद घाडीगावकर (पालक ), अमित लिंगावत (पालक ), जेष्ठ क्रीडा प्रेमी नारायण गुरव, अंजली जयसिंग गायकवाड (महिला क्रीडा प्रशिक्षक ), प्रमुख मार्गदशक. समीर जयवंत राऊत, सुवर्णा जोशी (सचिव ), बाळकृष्ण अ. कदम, समस्त ग्रामस्थ,शाळेचे क्रीडा शिक्षक व प्रचिती घाडीगावकर , आरोही गुरव , ज्ञानेश्वर गुरव यांनी त्याचे अभिनंदन केले.
फोँडकन देवी स्पोर्ट्स अकॅडमीचा “अद्वैत गुरव”चे लांब उडी स्पर्धे दणदणीत सुयश












