कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा ही योजना राज्यात सुरु करण्यात आली असून, पिंक ई-रिक्षा विरतण व रुपे कार्ड वितरण कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत दिनांक 2 मे 2025 रोजी राम कृष्ण सांस्कृतिक हॉल येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली आहे.
राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे. नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरातील इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली असल्याचे वाईंगडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आले आहे.












