कणकवली (प्रतिनिधी) : श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ, वरवडे (परबवाडी) सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री लिंगेश्वर मंदिर (लिंगाची भाटी) येथे बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘महाशिवरात्री उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे तरी या उत्सवास सर्व भाविकांनी उपस्थित राहुन तीर्थ प्रसाद तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळामार्फत करण्यात येत आहे. कार्यक्रम – सकाळी ९ ते १ – अभिषेक, दुपारी १ ते १.३० – महाआरती व तीर्थ प्रसाद, दुपारी २ ते ३ – महाप्रसाद, दुपारी ३ ते ६ – सांस्कृतिक कार्यक्रम (विविध स्पर्धा), सायं. ६ ते ७ – नदीपात्रात दिपार्पण सोहळा, सायं. ७ वा. – सुस्वर भजन. सर्व भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, हि नम्र विनंती,
स्थळ : स्वयंभू श्री लिंगेश्वर मंदिर, लिंगाची भाटी, वरवडे (परबवाडी)












