वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी यांच्यावतीने श्री महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. २५ ते २७ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. २५ ला सकाळी ९ ते १० वा. ब्राम्हणकरवी अभिषेक पूजा, सकाळी १० वा. घटस्थापना, विणापूजन, पंचपदी भजन, सकाळी ११. ३० वा. अखंड शिवलीलामृत ग्रंथ सामुहिक पारायण प्रारंभ, दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ५ वा. श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण, सायंकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ वै. ह. भ. प. सोनुबाबा कुर्णेकर, पायी दिंडी सेवा संस्था भांबेड आणि श्री गांगोरवळनाथ सांप्रदायिक हरिपाठ मंडळ ऐनारी, रात्री ८ ते १० वा. सुमधुर किर्तन ह. भ. प. जयेश महाराज कदम चिपळूण रात्री १०.३० वा. महाप्रसाद, रात्री १२. वा. पासून जागर व श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण.
बुधवार दि. २६ ला सकाळी ५ ते ७ वा. काकडा ह. भ प. श्री संदिप महाराज सकपाळ आणि सहकारी, सकाळी ७ ते ८ वा. ब्राम्हणाकरवी विधीवत अभिषेक व पूजा, सकाळी ८ ते ११ वा. श्री शिवलीलामृत ग्रंथ सामुहिक पारायण, दुपारी ११ ते १ वा. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, दुपारी १ ते १.३० वा. सामुदायिक शिवनाम जप, दुपारी १.३० ते २ वा. भजन, दुपारी २ ते ३ वा. उपवासाचा महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ७ वा. होम हवन व लघुरुद्राभिषेक, रात्री ७ ते ८ वा. हरिपाठ श्री गांगेश्वर हरीपाठ मंडळ गावठणवाडी, रात्री ८.३० ते १०.३० वा. सुमधुर किर्तन ह. भ. प. श्री संजय महाराज साळवी चिपळूण सौजन्य श्री दशरथ नारायण गुरव, रात्री १०. ३० ते ११.३० वा. उपवासाचा महाप्रसाद, रात्री १२ पासून पुढे जागर व श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण. गुरुवार दि. २७ ला सकाळी ५ ते ७ वा. काकडा ह. भ. प. संदिप महाराज सकपाळ आणि सहकारी, सकाळी ७ ते ८ वा. विधीवत अभिषेक पूजा, सकाळी ९ ते १० वा. श्री शिवलीलामृत ग्रंथ सांगता समारंभ सकाळी १० ते १२ वा. काल्याचे किर्तन ह. भ. प. महाराज साकवी चिपळुण दु. १२.३० ते १. वा. सत्कार समारंभ, दु. १ ते २ वा. दिंडी व पालखी सोहळा, दु. २ ते ३. वा. काल्याचा महाप्रसाद, तरी सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
ऐनारी येथे महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रम…











