नाधवडे येथे २५ ते २७ फेब्रुवारी कालावधीत महाशिवरात्री उत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री शंकर प्रासादिक सेवा मंडळ नाधवडे यांच्या वतीने मंगळवार दिनांक २५फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक २७फेब्रुवारी या कालावधीत श्री महाशिवरात्री उत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक २५ रोजी सकाळी ८ते ११ वाजता लघुरुद्र व आरती सकाळी ११ वाजता ग्रामस्थांसह पालखींचे आगमन सायंकाळी ३ते ५ संगीत भजने,रात्री १० वाजता चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ प्रस्तुत जलवा २०२५ तर बुधवार दिनांक २६रोजी सकाळी ९ ते १२ श्री चरणी इच्छुकांचा अभिषेक, सायंकाळी ३ ते ५ संगीत भजने, रात्री १० वाजता गावातील शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुरुवार दिनांक २७ रोजी सकाळी १०. ३० वाजता ग्राम दैवत श्रींचे शाही स्नान, दुपारी १२ ते २ वा.महाप्रसाद सायंकाळी ते ३ ते ५ यावेळेस संगीत भजने, रात्री १० वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दररोज दुपारी १ वा.वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती तसेच रात्री ८. ३० वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन शंकर प्रसादिक सेवा मंडळ नाधवडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!