खारेपाटण दुर्गादेवी मंदिर गाभाऱ्याच्या दरवाजा चोरट्याने तोडला

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शिवाजी पेठ येथील ऐतिहासीक किल्ले खारेपाटण येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिरच्या गाभाऱ्याच्या दरवाजा रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.०० ते ३.०० या वेळात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने दरवाजाचा कडी कोयंडा तोडला.मात्र गाभाऱ्यातील दान पेटी व त्यातील रक्कम चोरण्याचा चोरट्याचा प्रयत्न असफल ठरला.याबाबतची माहिती कालभैरव दुर्गा देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी मंगेश गुरव यांनी दिली.यामुळे खारेपाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,खारेपाटण येथील शिवकालीन दुर्गादेवी मंदिराचे चार वर्षापूर्वीच नूतनीकरण करून नवीन मंदिर बांधण्यात आलेले असून या मंदिराला भिंती नाहीत.किंवा त्याचा मुख्य दरवाजाला लॉक नाही.पूर्णतः चारी बाजूंनी खुले आहे.मात्र देवीच्या आतील गाभाऱ्याला दोन दरवाजे असून त्यांना लॉक आहे.व आतमध्ये दान पेटी आहे.दरम्यान डोंगर भागात किल्ल्यावर असणारे हे मंदिर मनुष्य वस्ती पासून थोडे दूर असल्यामुळे नेमका चोरट्याने या संधीचा फायदा उठवत भर दुपारी गाभाऱ्याच्या दरवाजा तोडत आत शिरण्याचा प्रयत्न केला.मात्र आतली दान पेटी त्याला फोडता न आल्यामुळे व उचलून नेने देखील शक्य नसल्यामुळे त्याचा हा प्रयत्न हा असफल ठरला.परंतु यापूर्वीही एकदा अशी चोरीची घटना दुर्गादेवी मंदिरात चोरट्यांकडून घडली होती.तरी पोलिसांनी याबाबत तपास यंत्रणा राबवून अशा चोरीच्या घडणाऱ्या घटनाना आला बसवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

error: Content is protected !!