सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवलीचे पुरस्कार वितरण शनिवार १ मार्च रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : गेली काही वर्षे सिंधुदुर्गच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली’ चा ‘सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ दीपा पवार यांच्या ‘पोलादी बाया’ आणि डॉ कालिदास शिंदे यांच्या ‘झोळी’ या आत्मकथनास जाहीर झाला आहे. तसेच ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ शाळा ‘साळशी नं १ मधील सहाय्यक शिक्षिका श्रीम. स्मिता सुनील कोदले याना जाहीर झाला आहे.

ह्या पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. ०१ मार्च २०२५ रोजी नगरवाचनालय सभागृह, कणकवली येथे डॉ. रुपेश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नरडवे हायस्कुलचे निवृत्त मुख्या आर. एस. जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकुश कदम, डॉ. चंद्रकांत पुरळकर, ऍड. विलास परब, इंजि. अनिल जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ४.३० वाजता करण्यात येणार आहे.

सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या साहित्य पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून याआधी हा पुरस्कार ‘दिशा पिंकी शेख’ यांच्या ‘कुरूप’ या काव्यसंग्रहास आणि ‘डॉ रुपेश पाटकर’ यांच्या ‘ अर्ज मधील दिवस’ या अनुभव कथनात्मक पुस्तकास दिला गेलाय.

तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून याआधी हा पुरस्कार श्रीम. प्रतिभा कोतवाल,प्रफुल्ल जाधव, तेजस बांदिवडेकर या उपक्रमशील शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे.

वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या ‘सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान’ च्या या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ सतीश पवार आणि सचिव श्रीम. शुभांगी पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!