रोटरी क्लब वैभववाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांनी केले रक्तदान…

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त आयोजित रक्त दान शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्त दान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या शिबिरात वैभववाडीतील प्राथमिक शिक्षकवृंद व आनंदीबाई रावराणे महाविद्यालयचे शिक्षक वृंद यांनी आवर्जून रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर, डॉ. नामदेव गवळी, संजय रावराणे, मुकुंद रावराणे विद्याधर सावंत, सेक्रेटरी सचिन रावराणे तसेच राजेश पडवळ, दिनकर केळकर, राजेंद्र पाटील ,अनंत फोंडके, केंद्रप्रमुख जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. रोटरी प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर यांनी ४० व्या वेळा तर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांनी २८ वेळा, तसेच रोटरी वैभववाडी चे माजी अध्यक्ष व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री संजय रावराणे 31 वेळा रक्तदान केले या बद्दल रोटरी क्लब ऑफ प्रेसिडेंट यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!