ख्रिश्चन विकास मंडळाच्या समाज भूषण पुरस्कारांचे मुंबईत वितरण !

मसूरे (प्रतिनिधी) : सिंधदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ, मुंबई पुरस्कृत जॉन पिंटो स्मृती समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि नवकिरण मेळावा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाला.सदर पुरस्कार 2023 साठी माणगाव गावचे सुपुत्र पर्यावरण संवर्धन साठी विशेष काम करणारे श्री जोएल डिसिल्वा यांना तर 2024 साठी माणगावचे मुंबईत राहणारे समाजसेवक मोजेस फेराव यांना प्रदान करण्यात आला. मंडळाचे संस्थापक स्व थॉमस फर्नांडिस यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्यांदा देण्यात आलेला समाज निष्ठा हा पुरस्कार मंडळाचे सल्लागार आणी आरोंदा गावचे वयोवृद्ध समाज सेवक श्री बस्त्याव लोबो यांना बहाल करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसईचे सुप्रसिद्ध कवी सायमन मार्टिन हे उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री मनवेल आजगांवकर होते. कार्यक्रमाचे उदघाटन माजी पोलीस उप अधीक्षक दयानंद गवस यांनी केले तर फ्लोरन्स नायटिंगेल राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सुजाता तुस्कानो याही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सरचिटणीस विल्यम फर्नांडिस, अध्यक्ष पास्कॉल लोबो, कवी सायमन मार्टिन सुजाता तुस्कानो यांची या समयी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेबी फर्नांडिस यांनी केले तर आभार प्रदर्शन मेलवीन फर्नांडिस यांनी केले.

error: Content is protected !!