चंद्रराज लोणचे फॅक्टरी चे मालक दिनेश नारकर यांना पितृशोक
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील कट्टर समाजवादी विचारसरणीचे परोपकारी कार्यकर्ता शामराव सिताराम नारकर तथा भाई वय ८८ वर्षे यांचे वृद्धापकाळातील आजारपणात राहत्या घरी दुःख निधन झाले.त्यांचे स्मिताहास्य, नर्मविनोदी, स्पष्ट वक्तेपणामुळे आणि परोपकारी स्वभावामुळे ते सुपरिचित होते. त्या प्रतिकूल परिस्थितीत मुंबई येथे शिक्षण घेत असताना ते राष्ट्रसेवा दलामधील कार्यात सक्रिय झाले .आणीबाणी काळात त्यांनी तुरुंगवास भोगला. साने गुरुजी यांच्या विचारसरणी वर त्यांचा गाड विश्वास होता.इथूनच त्यांच्या कर्तव्यदक्ष आणि समाजसेवेला सुरुवात झाली. “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” या जाणिवेने कोणत्याही सुविधा नसताना त्यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीत किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन कोणतेही काम अडू दिले नाही. त्याची जाण आजही ग्रामस्थांमधून व्यक्त होताना दिसते.गावी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी आल्यावर काकांची जनता पक्षाचे स्वर्गीय प्राध्यापक मधु दंडवते आणि जनता दलाच्या नेत्यांशी गाढ मैत्री झाली. पक्षाची जबाबदारी, एकनिष्ठता आणि कट्टर विचारसरणी असा त्यांचा प्रवास आजच्या पिढीला मार्गदर्शक आहे.त्यानंतर त्यांनी चंद्रराज लोणचे फॅक्टरी ची निर्मिती करून ग्रामस्थांना रोजगार प्राप्त करून दिला..
त्यांच्या पश्चात मुलगा दिनेश,नातवंडे, भाऊ- बहिणी असा मोठा परिवार आहे. यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत असून, अंत्ययात्रेत समाजातील विविध स्तरातील अबाल वृद्धांनी उपस्थित राहून वैकुंठभूमीत श्रद्धांजली वाहिली..










