गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे त्रिंबक रामेश्वर मंदिरात दीपपूजन उत्साहात…!

आचरा (प्रतिनिधी) : दीप अमावस्येचे औचित्य साधून बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दीपपूजनाचा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला.

हिंदू संस्कृती, परंपरा आणि धार्मिक वारसा जपण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन व सेवा करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन व पूजनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला त्रिंबक ग्रामस्थ तसेच मंदिर कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे वरद जोशी, प्रसाद गुरव, स्वप्नील शिर्सेकर, विवेकानंद मेस्त्री, चंदन त्रिंबककर, चतुर त्रिंबककर, ओंकार गोसावी, हर्षद मडवळ, प्रथमेश चव्हाण, आकाश मेस्त्री, चंद्रकांत त्रिंबककर, हर्षद मेस्त्री, सुभाष मेस्त्री, चंदू त्रिंबककर, सोहम घाडीगावकर यांच्यासह प्रतिष्ठानचे शिवसेवक आणि त्रिंबक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

परंपरा, संस्कृती आणि गडकिल्ले संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. अशा उपक्रमांतून नव्या पिढीमध्ये आपल्या इतिहासाबद्दल अभिमान आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!