युवा पिढीसाठी शिवार्थ शेतकरी गटाचे कार्य कौतुकास्पद – रवींद्र पोमणे

पाणी फाउंडेशन च्या टीम कडून गटाची पाहणी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील दोन युवा शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या शिवार्थ शेतकरी गटाच्या उपक्रमांची, पाणी फाउंडेशन च्या टीमने पाहणी केली. विश्वास जोईल, अक्षय परब यांनी शिवार्थ शेतकरी गटामार्फत पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप मध्ये सहभाग घेतला. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना, त्याचे प्रात्यक्षिक दाखविले, फाउंडेशनचे समन्वयक शुभम, मनीष सर आणि मेंटर रवींद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, भात शेतीमध्ये कोळपणी करणे सुलभ व्हावे यासाठी ग्रास कटर चा उपयोग करून कमी कष्टात आणि वेळेत कोळपणी करण्याचे यंत्र त्यांनी विकसित केले.

गटामार्फत विचारांची, अनुभवाची देवाणघेवाण करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भात शेती फायद्यात येऊ शकते. हे या युवकांनी गटाच्या माध्यमातून दाखवून दिले. असे मेंटल देवेंद्र कांबळे यांनी सांगितले. एकीकडे युवा पिढी शेतीपासून दूर जात असताना या युवकांच्या शिवार्थ शेतकरी गटाचे काम कौतुकास्पद आणि इतरांसाठी मार्गदर्शक आहे, असे उद्गार रवींद्र पोमणे यांनी व्यक्त केले. यावेळी गटातील इतर शेतकरी मेंटर देवेंद्र कांबळे, मंडळ कृषी अधिकारी दुर्वा झुलपे, उप कृषी अधिकारी मानसी वेर्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षया परब इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!