सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जयराम जाधव यांना प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर

​ओरस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, पंचायत सदस्य आणि सामाजिक प्रशिक्षक जयराम जाधव यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून समर्पित भावनेने सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहेत. ​१५ ऑगस्टला शासकीय कार्यक्रमात होणार सन्मान जिल्हा मुख्यालय ओरस येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जयराम जाधव यांना या जिल्हा युवा पुरस्काराने अधिकृतपणे सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सामाजिक प्रशिक्षण, युवा संघटन आणि पंचायत पातळीवरील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जाधव यांच्या या यशामुळे त्यांच्या पाठीशी असलेल्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध सामाजिक व राजकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!