सापडलेले दिड तोळ्यांचे सोन्याचे ब्रेस्लेट दिले परत!
तळेरे (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षा या विषयावर कसार्डे हायस्कूल येथील डिझिटल हॉलमध्ये आज सत्यवान रेडाकर सरांचा कार्यक्रम होता.याप्रसंगी मुलांबरोबरच त्यांचे पालक देखील उपस्थित होते. त्यातील नांदगावचे पालक देसाई आले होते.कर्यक्रम चालू असताना अनवधनाने त्यांचा हातातील ब्रेसलेट जमिनीवर पडले. आणि त्या कार्यक्रम संपल्यावर पटकन निघून गेल्या. पण ते ब्रेसलेट तिथेच राहिले. नेहमीप्रमाने शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी रोहन भोगले यांना तेथील खुर्च्या तसेच सामानाची आवराआवर आणि हॉल स्वच्छता करण्यासाठी गेला असताना,तेथे पडलेले सोन्याचे ब्रेसलेट निदर्शनास आले. त्याने ते उचलले आणि ऑफिसकडे जमा करायला आला. तेवढ्याच तेथे देसाई नावाचे गृहस्थ आपले ब्रेसलेट शोधत शोधत शाळेंत आले आणि ते नेमके रोहण यालाच भेटले.ते म्हणाले की आमचं येथे ब्रेसलेट मिळालं का आपणास ? तर रोहन लगेच हो! म्हणाला,आणि प्रशालेच्या वरिष्ठ लिपिक श्रीम.कांबळे यांच्या समोर घेऊन गेला. त्याने ते ब्रेसलेट कांबळे यांच्या हस्ते देसाई या पालकांच्या हातात सुपूर्द केले. ते दीड तोळ्याचं ब्रेसलेट (म्हणजे आज भावाप्रमाणे एक लाख पस्तीस हजार रु किमतीचे) पाहून त्या आनंदित झाल्या ते ब्रेसलेट हातात घेतल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. कारण ते ब्रेसलेट त्यांच्या आईची आठवण होती. त्यांच्या आईने त्यांना गिफ्ट म्हणून दिल होत.याबद्दल त्यांनी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी रोहन भोगलेचे मनापासून आभार तर मानलेच.पण 500/- चे बक्षीस पण देऊ केले. पुन्हा रोहनचा प्रामाणिकपणा जागा झाला आणि ती रक्कम नको म्हणाला. आमचं कामच आहे ते असं म्हणून त्यांने त्या देत असलेली बक्षिस रूपी रक्कम नाकारली.पण खूप आग्रह करीत राहिल्या केल्याने शेवटी शाळेच्या लिपिक कांबळे मॅडम आणि ब्रेसलेटच्या मालकिन देसाई मॅडम यांच्या आग्रहाखातर 1000/- रुपयांची रक्कम बक्षीस रूपात स्विकारावी लागली शेवटी त्यांनी रोहन सोबत एक फोटो काढल. आज प्रामाणिकपणा हरवत चाललेला असानाही रोहनने दाखविलेला प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद आहे.












