खारेपाटण हायस्कूल ला इंटर अँक्टिव्ह बोर्ड प्रदान
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ खारेपाटण (क्लब आय डी – २२६७३९) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी खारेपाटण मधील एकूण २० शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.तर शेठ न.म. विद्यालय खारेपाटण या हायस्कूलला शालेय विद्यार्थ्यांकरिता १ इंटर अँक्टिव्ह बोर्ड रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ प्राची ईसवलकर,पंचायत समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,प्रशालेचे मुख्याध्यापक रोट.संजय सानप, पर्यवेशक रोट.संतोष राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य रोट.ए डी कांबळे,रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे सचिव रोट.सुबोध देसाई,ट्रेझरियन रोट.शर्मिन काझी,रोट.दयानंद कोकाटे,रोट. संतोष पाटणकर,अजय गुरसाळे यशवंत रायबागकर तसेच भाऊ राणे,विजय देसाई,योगेश गोडवे,राजेंद्र वरुणकर,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण हायस्कूलच्या
भव्य मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने शालेय विद्यार्थिनींना अर्थात मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी व सुरक्षित प्रवासाला नवी दिशा मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले असल्याचे रोटरी च्या वतीने सांगण्यात आले.










