कणकवली (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत तालुक्यातील 97 प्रकरणाला मंजुरी देण्यात आली. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक झाली.
येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या या बैठकीला श्री. देशपांडे यांच्यासहित गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकून डी. एम. पाटील, हेमलता तोरस्कर, अक्षता बागवे व इतर उपस्थित होते.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या 48, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या गट अ मधील 8, श्रावणबाळ सेवा राष्ट्रीय निवृत्ती योजना गट ब मधील 33, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेच्या 8 अशा एकूण 97 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.











