सिंधुदुर्गकन्या सुंदरी डान्स शो फेम सेलिब्रेटी नृत्यांगना दिक्षा नाईकचा विशेष सन्मान

सिने नृत्यदिग्दर्शक श्री आशिष पाटील यांच्या उपस्थितीत चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळने 50 हजार रुपये नृत्य शिष्यवृत्ती सह भव्य ट्रॉफी देत केला गौरव

चौके (प्रतिनिधी) : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजीत नृत्य सन्मान सोहळा 2025 या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील सर्वात मोठा अवॉर्ड सोहळा नुकताच मराठा समाज हॉल कुडाळ येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मराठी नृत्य इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकणारी पहिली नृत्यांगना सुंदरी फेम सेलिब्रेटी कु.दिक्षा प्रमोद नाईक हिचा भव्य असा सन्मान करण्यात आला. दिक्षाला 50000 रुपये नृत्य शिष्यवृत्ती तसेच भव्य अशी ट्रॉफी शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, कुडाळ नगर पंचायत नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता बांदेकर, नेहा फिशरीज चे सर्वेसर्वा जितेंद्र सावंत चिमणी पाखरं सल्लागार सुनिल भोगटे, रवि कुडाळकर, प्रमोद नाईक कृपा नाईक सतिश पावसकर, नगरसेविका नयना मांजरेकर, संजना परब, नागेश नाईक उपस्थित होते. दिक्षा नाईक ही मराठी नृत्य इंडस्ट्री मध्ये व्यावसायिक नृत्य क्षेत्रात पाऊल टाकणारी जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना ठरली असून नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी तिला जी संधी दिली त्या बद्दल संपूर्ण चिमणी पाखरं टिम च्या वतीने त्यांचे आभार मानन्यात आले. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण चिमणी पाखरं टिम कडून तिचा सन्मान करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!