पालकमंत्री नितेश राणे यांचा एक फोन आणि दोन एस टी बस तातडीने सुरू

खारेपाटण मधील प्रवासी वर्गामध्ये समाधान

सावंतवाडी एस टी डेपोच्या बंद ठेवण्यात आलेल्या गाड्या पुन्हा सुरू

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण एस टी डेपो मध्ये येणाऱ्या व रत्नागिरी येथे जाणाऱ्या सावंतवाडी एस टी डेपोच्या सावंतवाडी – रत्नागिरी व सावंतवाडी – देवरूख या दोन एस टी बस गाड्या सद्या बरेच दिवस बंद करण्यात आल्या होत्या. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांनी ही बाब राज्याचे मस्त्य उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची मंत्री महोदयांनी तातडीने दखल घेऊन संबधीत म.रा.प.विभाग सिंधुदुर्ग जिल्हा अधिकाऱ्यांना (डी सी) याना एक फोन करताच बंद करण्यात आलेल्या दोन एस टी बस अखेर आज पासून सुरू करण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या वतीने सद्या भारनियमनाच्या नावाखाली बऱ्याच एस टी बस बंद करण्यात आल्याने याचा फ्टका ग्रामीण भागातील नागरिक व प्रवाशांना बसत आहे. व प्रवाशांना तासनतास एस टी बस ची वाट पहात उभे रहावे लागत आहे. दरम्यान खारेपाटण हे बाजार शहर असल्याने व येथे आजूबाजूच्या सुमारे ३० गावातील ग्रामस्थ बाजार रहाट तसेच आपल्या दैनंदिन कामासाठी खारेपाटण येथे येत असल्याने येथे एस टी गाड्या सुरळीत सुरू असणे गरजेचे आहे.

मात्र प्रवासी व नागरिकांचा कोणताही विचार न करता एस् टी बस अचानक रद्दबातल करून प्रवाशांची एस टी महामंडळ गैरसोय करत आहे.खारेपाटण एस टी बस स्थानक येथे येणारी व सावंतवाडी येथून सकाळी १०.०० वाजता सुटणारी रत्नागिरी गाडी तसेच सावंतवाडी डेपो मधून दुपारी १.०० वाजता सुटणारी देवरूख गाडी बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. आज मंगळवार पासून या दोन्ही गाड्या पुन्हा एकदा नियमित सुरू केल्यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून पालकमंत्री नितेश राणे तसेच एस् टी महामंडळाचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!